शिरपूर । शिरपूर तालुक्यातील थाळनेर भोरखेडा रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत बेवारस स्थितीत मोठा औषधांचा साठा फेकला गेलेला ग्रामस्थांना आढळला. पोलिसांनी हा औषधसाठा ताब्यात घेतला आहे. या औषधांवर महाराष्ट्र शासन-विक्रीसाठी नाही असे इंग्रजीत लिहिले आहे या औषधांमध्ये एड्स रोगावरील किट्स, लसी, गोळ्यांची पाकिटे, इंजेक्शन आदी साहित्याचा समावेश आहे. यातील काही औषधी मुदतबाह्य तर काही औषधी सन 2020 पर्यंत वापरण्याजोगी आहेत ही औषधे एखादया आरोग्य केंद्रावरील असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा औषध साठा नेमका आला कुठून याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. एका बाजूला औषधसाठा उपलब्ध नाही तर दुसर्या बाजूला औषधे अशा पद्धतीने फेकले जातात. याविषयी वरिष्ठ पातळीवर तपास करून कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.