रस्त्यावर पडलेल्या झाडामुळे यावलचा दुचाकीस्वार जखमी

0

यावल- रस्त्यावर पडलेल्या झाडामुळे दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री हॉटेल केसरबागजवळ घडली. दुचाकीस्वार अक्षय प्रकाश महाजन (27, रा.यावल) हे गुरुवारी रात्री दुचाकीवरून येत असताना समोरून येणार्‍या वाहनाच्या प्रकाशामुळे त्यांना रस्त्यावर पडलेला वृक्ष न दिसल्याने वाहन वृक्षावर धडकून त्यांना डोक्यावर मानेवर गंभीर दुखापती झाल्या. घटनास्थळी पोलिस निरीक्षक डी.के. परेेदशी, गणेेश मनुरे, विजय जावरे यांनी धाव घेत जखमीस यावल रूग्णालयत दाखल केले. डॉ. रश्मी पाटील यांनी प्रथमोपचार करीत जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले. पुन्हा या वृक्षामुळे अपघात घडू नये म्हणून पोलिसांनी नागरीकांच्या मदतीने वृक्ष रस्त्यावरून हटवले. घटनास्थळी मोठया संख्येत जनसमुदाय जमला होता व सार्वजनिक बांधकामाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला.