रहाटणीत घर चलो अभियानाची सुरूवात

0

सांगवी ः प्रतिनिधी – सांगवी, रहाटणी, काळेवाडी मंडल भाजपच्यावतीने घर चलो अभियानाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप व भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंत भावे यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विकासकामांबद्दल घर चलो अभियानाअंतर्गत नागरिकांना संदेश देऊन मुंबई या ठिकाणी चालण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजक सांगवी, रहाटणी, काळेवाडी मंडलाचे अध्यक्ष प्रमोद ताम्हणकर व ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत नखाते, विधानसभा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राज तापकीर, अमोल थोरात, शुभम नखाते, संकेत कुटे, श्रीराम कुटे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेवक अमरनाथ कांबळे, नगरसेविका सविता खुळे, निर्मला कुटे, सीमा चौगुले, चंदा लोखंडे, माधवी राजपूरे, आदिती निकम, माधव मनोरे, राजू लोखंडे आणि भाजपचे कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक संघ आदी उपस्थित होते.