रहिवासी इमारतीत अनाधिकृत गाळे?

0

पिंपरी-चिंचवड : शहरातील रहिवासी इमारतींमध्ये असणार्‍या अनाधिकृत गाळ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुपच्यावतीने महापालिका आयुक्त आणि नवनगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याकडे करण्यात आली आहे. गाळ्यांमध्ये पार्किंगच्या जागेमध्ये विविध प्रकारचे व्यवसाय राजरोसपणे थाटले आहेत. त्यामुळे प्रशासनाचा करोडो रुपयांचा महसुल या माध्यमातून बुडविला जातो. इमारती, सोसायट्यांच्या गाळ्या तसेच पार्किंगच्या जागेत अनाधिकृतरित्या विविध प्रकारचे उद्योग, व्यवसाय केले जातात.

अन्यथा न्यायालयात जाणार
एकीकडे अनाधिकृत अतिक्रमण या कारणास्तव टपरी, पथारी हातगाड्यांवर कारवाईची मोहिम तेजीत असताना मात्र या गाळे पार्किंगवर चाललेल्या व्यवसायांकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे तात्काळ यावर कारवाई करावी, अन्यथा महापालिकेच्या गलथान कारभाराविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या जाईल, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.