* डुकरानंतर वासराचा पाडला फडशा
* वनविभागाने लावला दुसरा पिंजरा
चाळीसगाव – तालुक्यातील बहाळ, जामदा, रहीपुरी परीसरात बिबट्याची दहशत सुरुच असुन आतापर्यंत बिबट्याने एका डुकरासह बकऱ्या व वासरे असे एकुण १० जनावरे फस्त केली आहेत आज रात्री रहीपुरी शिवारातील शेतात एका वासरीवर हल्ला करुन तिचा फडशा पाडाला असुन वनविभागाने तात्काळ त्याठिकाणी दुसरा पिंजरा बसवला आहे. घटनास्थळी तहसिलदार कैलास देवरे यांनी भेट देवुन परीसराची पाहणी केली आहे.
गेल्या काही महीन्यापुर्वी गिरणा पट्टा परीसरात नरभक्षी बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यात ७ जणांचा बळी जावुन अनेक जनावरे त्या बिबट्याने फस्त केल्याने पुर्ण तालुका हादरुन दहशतीखाली होता. त्या बिबट्याला ठार केल्यानंतर शांततेचे वातावरण झाले व नागरीक भयमुक्त झाले होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होवु लागले असुन तालुक्यातील बहाळ, जामदा, मेहुणबारे परीसरात या बिबट्याने धुमाकूळ घातला असुन परीसरातील अद्याप पावेतो 10 जनावरे फस्त केली आहेत, त्यात बकऱ्या, वासरे व एका डुकराचा समावेश आहे काल रहीपुरी शिवारात बिबट्याने एका डुकरावर हल्ला केला होता. वनविभागाने ते मेलेले डुक्कर पिंजऱ्यात ठेवुन बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्या तेथे न येता रहिपुरी शिवारातील एकनाथ गुंजाळ यांच्या शेतात बांधलेले वासरावर हल्ला करुन त्याला फस्त केले आहे या घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे वनरक्षक प्रवीण गवारे व पथक त्याठिकाणी जावुन पाहणी केली असता हल्ला बिबट्यानेच केल्याने त्यांनी पुन्हा त्याठिकाणी दुसरा पिंजरा बसवला असुन बिबट्याला पकडण्याची शोधमोहीम तिव्र केल्याची माहिती चाळीसगाव वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) संजय मोरे यांनी दिली आहे.