रांगोळीच्या माध्यमातून चितारली खाकी वर्दीची छटा !

0

जळगाव । येथील केसीई संस्थेच्या ओजस्वीनी कला विभागातर्फे रिमझीम कला प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, कलावंत महेंद्र खाजेकर, संचालक किरण बेंडाळे, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, चंद्रकांत भंडारी व प्राचार्य अविनाश काटे यांच्याहस्ते झाले. यावेळी महेंद्र खाजेकर (औरंगाबाद) यांनी अधीक्षक दत्तात्रय कराळे यांचे रांगोळीत हुबेहुब चित्रण करुन उपस्थितांना आश्‍चर्याचा धक्का दिला.