रांजणगाव येथे अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

0

चाळीसगाव – तालुक्यातील रांजणगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीला शौचाहुन परतत असतांना रांजणगाव गावालगत असलेल्या बाणगाव रस्त्यालगत शेतात गावातील आरोपीने नेवुन अत्याचार केल्याची घटना २३ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी ३ वाजता घडली असुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील राजणगाव गावठाण येथील १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक २३ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ती शौचाहुन परतत असतांना रांजणगाव गावाचे बाणगाव रस्त्यालगत रांजणगाव गावातील आरोपी भूषण रतन नवगीरे याने फिर्यादीचे तोंड दाबुन मक्याच्या शेतात नेवुन तिच्यावर अत्याचार केला याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपी भूषण रतन नवगीरे रा.रांजणगाव ता चाळीसगाव याचे विरोधात गुरनं १०२/२०१८ भादवी कलम ३७६, लैंगिक गुन्ह्यापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोउनि जगदीश मुळगीर करीत आहेत.