चाळीसगाव व राईनपाडा घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करा-मुंडे

0

नागपूर- धुळे जिल्ह्यातील सक्री तालुक्यात असलेल्या राईनपाडा येथे मुल पळविण्याच्या संशयातून ५ जणांना मारहाण करून निर्घुण हत्या करण्यात आली. संपूर्ण राज्यात या घटनेचा निषेध होत असून महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटले. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या घटनेची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली. विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेवर ते बोलत होते.

चाळीसगाव येथे भटक्या समाजाच्या बहुरूपिंना  मारहाण झाली. ही घटना निंदनीय आहे. या  यासर्वघटनेच चित्रीकरण व्हायरल झाले आहे त्यामुळे अशा घटनांना बळ मिळाले. यातूनच धुळ्याच्या राईनपडा येथील हत्याकांड सारख्या घटना घडल्या. चाळीसगावला घडलेली घटनेत सत्तारूड भाजप पक्षाच्या सदस्यांचा समावेश आहे. एकूणच काय अशा घटनांमध्ये भाजप विचारसरणीच्या लोक या घटनांच्या मागे आहेत का अशी शंका होते या सर्व प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.