राईनपाडा घटनेतील आरोपींनी कठोर शिक्षा व्हावी

0

नाथजोगी समाजाचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

फैजपूर- धुळे जिल्ह्यातील व साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे केवळ संशयाच्या कारणावरून पाच जणांची क्रुरपणे हत्या करण्यात आली. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फैजपूर येथील नाथजोगी समाजाने प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे भिक्षुकी करून पोट भरणार्‍या पाच व्यक्तींची केवळ संशयाच्या कारणावरून बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. यामुळे मयतांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले असून या कुटुंबीयांना शासनाने त्वरीत मदत देवून त्यांचे पुर्नवर्सन करावे तर घटनेतील दोषी आरोपींना कठोरात कठोर शासन करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन नाथ जोगी समाजाच्या माध्यमातून प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार पी.सी.धनगर यांना देण्यात आले. यावेळी रामाराव मोरे, शहराध्यक्ष, सुनील वैद्य, रमेश जोगी, संतोष मोरे, मगन जोगी, जितेंद्र जोगी, सचिन जाधव, बंडूनाथ जोगी, जितु जोगी, वैभव जोगी, देविदास मोरे, विकास मोरे यांची उपस्थिती होती.