धुळे: साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे मुले पळवण्याच्या संशयावरून जमावाने पाच जणांची ठेचून हत्या केली होती. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत मुख्यमत्री देवेद्र फडनवीस यांनी नुकसान भरपाई म्हणून जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. दरम्यान दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले नंतर मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख
लहान मुलांना पळवणारी टोळी समजून धुळ्यात ५ जणांना बेदम मारहाण करण्यात आली. ही मारहाण इतकी अमानुष होती की या मारहाणीत ५ जणांचा मृत्यू झाला. हे संपूर्ण प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.