रिपाइंची प्रांताधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
भुसावळ- राईनपाडा हत्याकांडात पाच जणांचा नाहक बळी गेल्याने या हत्याकांडातील आरोपींवर कठोर कारवाई करावी तसेच हत्याकांडातील मयतांच्या वारसांचे पुर्नवसन करावे, अशी मागणी रिपाइं (आठवले गट) तर्फे शासनाकडे करण्यात आली. रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) च्या माध्यमातून प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात धुळे जिल्ह्यातील घटनेचा निषेध करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना कठोरात कठोर शासन करावे, मयतांच्या वारसांचे पुर्नवर्सन करून 10 लाख रूपयांची आर्थिक मदत करावी, मयतांच्या कुटुंबीयातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे अशा विविध मागण्यां निवेदनाद्वारे करण्यात आल्या. निवेदनावर रिपाईचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष रमेश मकासरे, लक्ष्मण जाधव, रविंद्रनाथ तायडे, विश्वास खरात, भगवान निरभवणे, शांताराम देशमुख, प्रकाश तायडे, नितीन ब्राम्हणे, पप्पू सुरडकर, प्रकाश सोनवणे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.