मुंबई:- राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून सत्ता स्थापन करण्यात आली. सत्ता स्थापन झाल्यानंतर आज प्रथमच शिवसेनेने आपल्या घटक पक्ष असलेल्या काँग्रेसवर टीका केली आहे. शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या दै. सामना वृत्तपत्रातून काँग्रेसच्या नाराजीवर भाष्य करण्यात आले आहे. ” राजकारणातील जुनी खाट कुरकुरु लागली ” असल्याचे आपल्या लेखात म्हटले आहे.
महाविकासआघाडी मधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाची नाराजी गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनली आहे. राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत तान मिळत नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते करत आहे. याविषयी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट काँग्रेसचे अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात भेट घेणार आहेत.
सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेसच्या नाराजी बद्दल भाष्य करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाचे सरकार मध्ये बरे सुरू आहे पण जुनी खाट जरा अधून-मधून जास्त कुरकुरते. खाट दुनिया असली तरी तिला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारे ही बरेच आहे. त्यामुळे ही कुरकुरता जाणवू लागल्याचे सामना मध्ये म्हटले आहे.