राजकारणाला पेक्षा समाजसेवेला महत्व -डॉ. कुंदन फेगडे

0

दरमहा होते मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

यावल- समाज सेवेत कुठल्याही प्रकारचे राजकारण न आणता सेवाभावी वृत्तीला महत्व असते. या उद्देशाने दरमहा मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रीया शिबिर घेत असल्याचे प्रतिपादन आश्रय फौऊंन्डेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांनी येथे व्यक्त केले. ते फॉऊंडेशनने आयोजित केलेल्या मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रीया शिबिरात बोलत होते.

यांची प्रमुख उपस्थिती
शहरातील डॉक्टरांचे आश्रय फौऊंडेशन आणि कांताई नेत्रालय, जळगाव यांच्या सहकार्याने सातवे भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सुरवातीला भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फॉऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे होते. फाऊंडेशनचे डॉ.पराग पाटील, डॉ.प्रशांत जावळे, कांताई नेत्रालयाचे युवराज देसरडा, डॉ. किरण जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ.फेगडे यांनी सामाजिक प्रश्नात वैयक्तीक पातळीवर लक्ष घालून ते सोडवण्याकरीता सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक डॉ.श्रीराम डाल्टन हे मुंबईपासून पायी जनजागृतीसाठी निघाले आहेत. ते नुकतेच सातपुड्यात येवुन गेले अशा सेवाभावी व्यक्तीमत्वाकडून आम्हाला देखील ऊर्जा मिळते व खर्‍या अर्थाने समाजसेवा निस्वार्थपणाने कशी करावी हे शिकायला मिळाले यामुळे तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याकरीता हे कार्य अविरत करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरात 173 रूग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यातील शस्त्रक्रियेस पात्र रूग्णांवर कांताई नेत्रालय, जळगाव येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शेखर पटेल तर आभार तुषार महाजन यांनी व्यक्त केले. यशस्वीतेसाठी स्नेहल फिरके, रितेश बारी, मनोज बारी, संजय फेगडे, लिलाधर काटे आदींनी परीश्रम घेतले.

सेवाभावी फाऊंडेशन
डॉक्टरांकडे समाज व्यावसायीक दृष्टीने पाहतो मात्र यावल-रावेरमधील डॉक्टरांच्या या आश्रय फौऊंडेशनकडून केले जाणारे सेवाभावी कार्य आदर्श घेेण्यासारखेे आहे. डिसेंबर 2017 पासून ते आजवर दरमहा 13 तारखेला यावलला नियमित शिबिर घेणेे सोपे कार्य नाही, असे कांताई नेत्रालयाचेे शिबिर संयोजक युवराज देसरडा यांनी सांगितले.