राजकीय घडामोडींना वेग; उद्धव ठाकरे आमदारांच्या भेटीला !

0

मुंबई: राज्यातील सत्ता संघर्ष आता अधिकच शिंगेला पोहोचेल आहे. कॉंग्रेस आमदारांमध्ये शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत एकमत झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आले आहे. शिवसेना आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान आता शिवसेना पक्षप्रमुख त्या हॉटेलकडे रवाना झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा राजकीय घडामोडींना मोठे वळण लागले आहे. मढ येथील हॉटेल रिट्रीट येथे शिवसेनेचे आमदार थांबले आहे. त्याठिकाणी आता उद्धव ठाकरे निघाले आहे. मातोश्रीवरून त्यांनी स्वत: गाडी चालवत निघाले आहे. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे देखील आहे.

काही वेळापूर्वीच कॉंग्रेस आमदारांनी शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत एकमत दर्शविले आहे.