पुणे-बनावट कागदपत्रे तयार करुन लाखो रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी पुणे शहरातील राजगुरुनगर सहकारी बॅंकेचे संचालक अध्यक्ष, माजी अध्यक्ष यांच्यासह दोन शाखा अधिकारी अशा २१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. राजगुरूनगर सहकारी बँकेच्या बुधवार पेठ शाखेत हा आर्थिक घोटाळा घडला आहे. सर्व आरोपीना न्यायालयात हजर केला असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
जामिनावर सुटका
वाहन कर्ज देण्याच्या नावाखाली संचालकांनी आपापसात संगनमत करुन बनावट कागदपत्राद्वारे ५८ लाख रुपयांचे कर्ज दिल्याचे उघड झाले आहे. सदर प्रकरणामध्ये बॅंकेचे संचालक अध्यक्ष, माजी अध्यक्ष यांच्यासह दोन शाखा अधिकाऱ्यांना अटक करुन कोर्टामध्ये हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. ए. दरवेशी यांच्या न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. याप्रकरणी विशेष लेखा परीक्षक विजय नथू पालखे यांनी फिर्याद दिली आहे.
यांचा आहे समावेश
बँकेच्या संचालकामध्ये दीपक पोपट वारूळे, धनंजय मधुकर कहाणे, प्रताप महादेव आहेर, किरण चंद्रकांत आहेर, किरण चंद्रकांत आहेर, किरण वसंतराव मांजरे, अशोक महादू भुजबळ, राजेंद्र मारूती सांडभोर, दत्तात्रय काशीनाथ गोरे, विजया शिंदे, राजेंद्र वाळुंज, गणेश एकनाथ ठिकळे, राहुल पोपटराव तांबे, हेमलता सेनापति टाकलकर, दिनेश रमेश ओसवाल, सतीश बबनराव नायकडेपाटील, परेश चंद्रकांत खांगटे, नंदकिशोर रखमाजी सोनावणे, विनायक शुरसेन घुमटकर, मुकुंद मारूती आवटे, अशोक मोतीलाल ओसवाल, अशोक कोंडाजी गावडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रकरणाचा अधिक तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत.