आमदार सुनील तटकरे यांचा विधानपरिषदेत आरोप
हे देखील वाचा
नागपूर:नाणारप्रकरणी विधानपरिषदेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी आमदार सुनील तटकरे म्हणाले कि, सत्ताधारी पक्षातील आमदार राजदंड पळवतात हे महाराष्ट्रात कधी घडले नाही. विरोधी पक्षातील लोकांनी हे केले असते तर सदस्याला बडतर्फ करण्याची भूमिका घेतली गेली असती पण काल सत्ताधारी सदस्यांनी जे केले त्यावर काहीच झाले नाही असा आरोप तटकरे यांनी केला.
नाणार प्रकल्पाबाबत उदयोगमंत्री सुभाष देसाई यांनी नोटिफिकेशन रद्द करण्याची घोषणा कोकणवासीयांसमोर केली. मुख्यमंत्र्यांनी ती त्यांची वैयक्तिक भूमिका होती असे म्हटले. कॅबिनेट मंत्र्यांची भूमिका वैयक्तिक कशी असू शकते. राज्य सरकार रुल ऑफ डुईंग बिझनेसनुसार चालणार आहे की नाही ? असा सवाल तटकरे यांनी केला. कोकणातील वातावरणाला छेद देणारा हा नाणार प्रकल्प आहे. मागे मुख्यमंत्र्यांनी एक बाब स्पष्ट केली की, नाणारविषयी सुभाष देसाईंचा अभ्यास झाला आहे पण सरकारचा झाला नाही ही सरकारमधील विसंगती आहे असेही तटकरे म्हणाले. कोकणवासीयांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हे सरकार टेकू असलेले सरकार आहे त्यामुळेच हे घडत आहे. त्यामुळे या विषयावर सविस्तर चर्चा व्हायला हवी अशी मागणी त्यांनी लावून धरली.