राजपत्रित अधिकार्‍याचे कल्याणकेंद्र उभे राहणार

0

जळगाव । राज्य शासनाच्या विविध विभागांतील सव्वा लाख ‘अ’, ’ब’ राजपत्रित अधिकार्‍याचे समान प्रश्न शासन प्रशासनाशी चर्चा करून सोडविण्यासाठी 7 फेब्रुवारी 1986 रोजी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ हे व्यासपीठ स्थापन करण्यात आले. महासंघात एकून अधिकार्‍याच्या 70 खाते संघटना सलंग असून त्याला शासन मान्यता मिळाली असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष मनोहर पोकळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात आयोजित राजपत्रित अधिकार्‍याच्या बैठकीमध्ये माहिती दिली. यावेळी समीर भाटकर, नितीन काळे,ग. दि कुलये यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाकडून अधिक मागण्यासह पारदर्शक, भ्रष्ट्राचार मुक्त शासन प्रशासनासाठी ’कार्यसंस्कृती’ व पगारात भागवा अभियान ,माहितीचा अधिकार, लोकसेवेची हमी आदी लोकाभिमुख कायद्याचा प्रचार सुरु असल्याचे पोकळे यांनी सांगितले.