राजश्री शाहू महाराज पुरस्काराने जोत्स्ना धनगर सन्मानित

0
चोपडा – राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार हा दहावीच्या पारिक्षेत जोत्स्ना उमेश धनगर या विद्यार्थिनी अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय कमळगाव या शाळेतुन ७५.८० टक्के गुण मिळवून एन.टी. प्रवर्गातून व शाळेतून प्रथम आली होती. तिच्या या यशाबद्दल रूपये ५००० चा धनादेश व पारितोषिक  सहाय्यक आयुक्त कार्यालय समाजकल्याण जळगाव यांच्या मार्फत समन्वयक जितेंद्र धनगर यांच्या उपस्थितीत देण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मधुकर धनगर, सेक्रेटरी पंडित न्हायदे, मुख्याध्यापक पी.के.नायदे, पांडुरंग न्हायदे, एस.एस.जाधव, व्ही.सी.पाचपोळ, बी.जे.पाटील, एन.पी.पाटील, आर.एम.पाटील, ए.डी.कोळी, व्ही.बी.सोनवणे, व्ही.व्ही.धनगर, पी.पी.बाविस्कर, डी.एस.कोळी, पी.एन.सावळे, व्ही.जे.दोडे, वाय.डी.कचरे, एस.टी.धनगर, डी.व्ही.मिस्तरी, डी.एन.न्हायदे, व्ही.एस.बाविस्कर उपस्थित होते.