राजस्थानमधील 200 विधानसभा जागांवर निवडणूक लढवण्याचा बसपाचा विचार

0

जयपूर : बहुजन समाज पार्टी (बसपा) राजस्थानमधील सर्व 200 विधानसभा जागांवर निवडणूक लढविण्याचा विचार करीत आहे. “आमची तयारी पूर्णत: झाली आहे आणि आगामी निवडणुकीत आम्ही 200 जागांवर निवडणूक लढवू,” असे पक्षाचे राज्य उपाध्यक्ष डंगरराम गेदर यांनी सांगितले.

राजस्थानमध्ये 7 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. बसपाने 2013-विधानसभा निवडणुकीत पक्षाने 3.37 टक्के मतदानाद्वारे तीन जागा जिंकल्या होत्या. 2008 च्या निवडणुकीत पक्षाने सहा आमदार जिंकले तेव्हा 7.60 टक्के मतदान पक्षाला झाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने 19 मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविली होती.

2018-निवडणुकीत आम्ही आमची संख्या वाढवण्याची अपेक्षा करीत आहोत. लोक भाजपा आणि काँग्रेस दोन्हीशी नाखुश आहेत . सत्तारुढ भाजपाविरूद्ध असंतोष आहे आणि लोकांना काँग्रेसमध्ये कोणतीही आशा दिसत नाही, असे बीएसपी नेते भगवान सिंग म्हणाले. निवडणुकीदरम्यान पक्षाच्या अध्यक्षांची राज्याच्या वेगवेगळ्या भागात रॅली आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.