राजस्थानातील हत्येचे समर्थन नाही, पण..!

0

राजस्थानमध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधातील उद्रेकातून उदयपूर येथील शंभूनाथ रायगर याने महंमद शेख याच्यावर कुर्‍हाड आणि तलवार यांनी वार करून ठार केले. या हत्येचे कदापि समर्थन होऊ शकत नाही, पण ‘लव्ह जिहाद’ ही गंभीर समस्या आहे, हे नाकारून चालणार नाही. आज असंख्य सौज्ज्वळ, भोळ्या मुली या कटात अडकल्या आहेत आणि अनेक संभाव्य स्वरूपात अडकतीलही. या कारस्थानाला बळी ठरलेली राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव हे उदाहरण आहे. त्यामुळे असंख्य महिलांच्या जीवनाच्या सुरक्षेचा प्रश्‍न म्हणून या समस्येकडे पाहणे गरजेचे आहे.

राजस्थानमध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधातील उद्रेकातून उदयपूर येथील शंभूनाथ रायगर याने महंमद शेख याच्यावर कुर्‍हाड आणि तलवार यांनी वार केले आणि त्याला जाळून टाकले. एवढेच नाही, तर ‘लव्ह जिहाद थांबवला नाही, तर जिहादींची अशीच अवस्था केली जाईल’, अशी चेतावणी देणारी ध्वनीचित्रफीतही प्रसारित केली. लोकशाहीत कायदा हातात घेऊन केल्या गेलेल्या या कृत्याचे समर्थन करता येणार नाही. परंतु, ‘लव्ह जिहाद’ ही समस्या आहे, हे नाकारून चालणार नाही.

1990 च्या दशकात भारतात ‘लव्ह जिहाद’ फोफावायला प्रारंभ झाला. तसे पाहायला गेले, तर महंमद बिन कासीम, अल्लाउद्दीन खिलजी, टिपू सुलतान, हुमायून, अकबर या मुसलमान आक्रमकांच्या कार्यकाळातही हा जिहाद होताच. या कट्टरवाद्यांनी कित्येक हिंदू महिलांवर बलात्कार करून त्यांना जनानखान्यात कोंबल्याचा इतिहास आहे. या आक्रमकांचा पूर्वीचा जिहाद हा उघडपणे होत होता आणि आता तो छुप्या पद्धतीने आणि फसवणुकीने होत आहे, इतकाच काय तो भेद! गेल्या 2 दशकांत भारतात पद्धतशीरपणे ‘लव्ह जिहादी’ निर्माण करण्यात आले. हिंदू मुलींशी जवळीक साधण्याचे मुसलमान कट्टरवाद्यांना विशेष प्रशिक्षण आणि त्यासाठी बक्कळ पैसे देण्यात आले. पैशांची रक्कम फसवल्या जाणार्‍या हिंदू मुलीच्या जातीवर अवलंबून होती. काही वर्षांपूर्वी संभाजीनगर येथे मुस्लीम मौलवींकडून ‘लव्ह जिहादसाठी प्रत्येक दिवशी दोनशे रुपये घ्या आणि हिंदू मुलींना बाटवा’, असा फतवा निघाला होता. हे प्रकारही अजूनही चालूच आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकार्‍याने ‘लव्ह जिहाद’साठी हवालाच्या माध्यमातून विदेशातून पैसा येत असल्याचे मान्य केले होते. दमाम (सौदी अरेबिया) येथे असलेली इंडियन फ्रॅटर्निटी फोरम ही संस्था, लश्कर-ए-तोयबा तसेच अन्य अनेक संस्था लव्ह जिहादसाठी खोर्‍याने पैसा पुरवतात. शंभूनाथप्रकरणी मृत शेखची निर्घृण हत्या झाल्यामुळे त्याला न्याय मिळण्याचा आग्रह धरावा. मात्र, त्याचवेळी हिंदू मुलींच्या सौज्ज्वळ आणि भोळ्या स्वभावाचा गैरफायदा जिहादसाठी घेणे हेही गैर आहे, याकडे यासाठी केल्या जात असलेल्या अर्थसाहाय्याची चौकशी करण्याची मागणी होणे गरजेचे नाही का?

प्रेमाला धर्माचे बंधन नसते, ‘लव्ह जिहाद’ ही एक फसवी संज्ञा आहे, असे सांगून हिंदूंची दिशाभूल करणार्‍यांचा एक गट अस्तित्त्वात आहे. कट्टरवादी मुस्लिमांची वकिली करण्यात हा गट नेहमीच आघाडीवर असतो. मात्र, प्रेमाचा मुखवटा जेव्हा महिलांचे वशीकरण आणि लैंगिक शोषण करतो, महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतो, तेव्हा मात्र हा गट चिडीचूप असतो. तथाकथित प्रेमाचे या मंडळींकडून इतके उदात्तीकरण केले जाते की, मुलीला आतंकवाद्यांशी संबंध असलेल्या व्यक्तीकडे सोपवण्यासही त्यांना काही वाटत नाही. केरळच्या हादिया प्रकरणातही तेच समोर येत आहे. महंमद शेख याच्या मृत्यूनंतर जागोजागी शेखच्या मृत्यूच्या निषेधार्थ आंदोलने केली जात आहेत. बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने शेखला 3 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित केले आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन कायद्यानुसार शंभूनाथ याला शिक्षा होईलही, पण त्याने दावा केल्याप्रमाणे जर शेख याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून कुणा महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त केले असेल, तर त्याचे काय? याही बाजूने विचार व्हायला नको का, इथे फक्त एका शेखचा मुद्दा नाही, तर अगणित प्रत्यक्ष आणि सांभाव्य अबाला स्त्रियांच्या जीवनाचा प्रश्‍न आहे, एरव्ही महिलांच्या प्रश्‍नांसंदर्भात बोलणार्‍या महिला ब्रिगेड ‘लव्ह जिहाद’विषयी बोलतांना का कचरतात ? राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव हिचा नवरा जेव्हा त्याचा धर्म लपवून हिंदू असल्याचे भासवून तिच्याशी विवाहबद्ध होतो आणि नंतर खरे स्वरूप दाखवून ‘इस्लाम कबूल’ करण्यासाठी तिचा छळ करतो, याविषयी या सर्वधर्मसमभाववाले मत व्यक्त करत नाहीत. हा दुटप्पीपणा हिंदूंची मानहानी करणारा आहे. केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटनाच याविषयी आवाज उठवतात, असे नाही, तर केरळ उच्च न्यायालय, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांनी तसेच हिंदुत्वाविषयी आकस असूनही केरळचे माजी मुख्यमंत्री अच्युतानंदन यांनीही ‘लव्ह जिहाद’चे अस्तित्त्व मान्य केले आहे. एकट्या केरळमध्येच 2 हजार 500 हून अधिक प्रकरणे घडल्याचे पोलिसांच्या लेखी आहे. अन्य राज्यांची आणि फसवणूक होऊनही पोलिसांकडे न गेलेल्यांची आकडेवारी पकडली, तर ही संख्या पुष्कळ मोठी होईल. इस्रायलने त्यांच्या देशात अरब आणि ज्यू यांना विवाह करण्यासच कायदेशीर बंदी घातली आहे. भारतात तसे करणे दूरच उलट केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह ‘लव्ह जिहाद’विषयी अनभिज्ञता दर्शवत आहेत. जर हिंदुत्ववादी प्रतिमा असलेल्या पक्षाचा केंद्रीय गृहमंत्रीच असावधान आणि वस्तुस्थितीकडे कानाडोळा करणारा असेल, तर देशातील महिलांच्या सुरक्षिततेचे काय?

– चेतन राजहंस,
प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387