राजस्थान ऑडिओ क्लिपप्रकरण : केंद्रीय मंत्री, कॉंग्रेसच्या दोन आमदारांवर गुन्हा दाखल

0

जयपूर: कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंड पुकारल्याने राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार अडचणीत आले आहे. कॉंग्रेसने पायलट यांच्यावर कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री पदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून पायलट यांना दूर केले आहे. मात्र अजूनही राजस्थान सरकारवरील संकट कायम आहे. एका ऑडिओ क्लिपमुळे राजस्थानमधील राजकारणात खळबळ माजली आहे. या ऑडिओ क्लिप प्रकरणात काँग्रेसने थेट भाजपाचे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह काँग्रेसचे बंडखोर आमदार भंवरलाल शर्मा व संजय जैन यांची नावे घेतली होती. त्यानंतर राजस्थान पोलिसांच्या विशेष पथकानं गजेंद्र सिंह यांच्यासह काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.