प्रतिनिधी। वरणगांव
वरणगांव शहरात यंदा अनेक गणेशोत्सव मंडळांनी भव्य – दिव्य अशा आकर्षक विघ्नहर्ता गणरायाच्या मुर्तींची स्थापना केली आहे . त्यापैकीच रामपेठचा राजा ची गणेश मुर्ती तसेच आकर्षक सजावटीचा आकर्षक दरबार भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे .
शहरातील रामपेठ मधील क्रांती मित्र मंडळाला ५५ वर्ष पूर्ण झाले असून सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या या मंडळाच्या वतीने गेल्या काही वर्षापासून रामपेठचा राजा म्हणून सुंदर भव्य – दिव्य तसेच आकर्षक मुर्तीची स्थापना केली जात आहे . यंदाही सुंदर व आकर्षक अशा रामपेठचा राजा श्री गणरायची स्थापना केली असल्याने भाविकांची दर्शनार्थ भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे . तर श्री गणरायाची स्थापना केलेल्या राजाचा दरबार भाविकांचे आकर्षण ठरत असुन अनंत चतुर्दशीच्या दिवशी अखेरचा निरोप व श्री गणरायाचे अनोखेरूप पाहण्यासाठी तसेच विसर्जन मिरवणुकही भाविकांचे लक्ष वेधून घेते . यामुळे वरणगांवसह परिसरातील गणेश भक्तांची आपल्या या गणरायाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते .
*अशी आहे मंडळाची कार्यकारणी*
रामपेठ भागातील क्रांती मित्र मंडळाच्या यंदाच्या कार्यकारणी समिती मध्ये अध्यक्ष पदी गणेश आत्माराम धनगर ( माजी नगरसेवक ), उपाध्यक्ष – विजय दौलत बावणे , सचिव – प्रकाश गुमळकर, खजिनदार – किरण सुधाकर बावणे, सह खजिनदार – भगवान माळी तर सदस्य म्हणून भुरा भोई, भरत चांदणे, चेतन कुंभार व रामपेठ भागातील गणेशभक्त युवकांचा समावेश आहे .