राजीवगांधीनगरात तरूणावर चाकू हल्ला

0

जळगाव। शहरातील राजीवगांधी नगरात बुधवारी रात्री अकरा वाजता किरकोळ कारणावरून एकाला चाकून भोसकल्याची घटना घडली असून जखमी तरूणाला जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमीच्या भावाच्या तक्रारीवरुन प्राणघातक हल्ला चढवल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात येवुन मारेकर्‍यांमधुन एका महिला संशयीतास अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने महिलेची पोलिस कोठडीत रवानगी केली.

महिलेस दोन दिवसांची सुनावली पोलिस कोठडी
राजीव गांधीनगर भागात बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास राहुल प्रल्हाद सकट (वय-25) हा तरुण घराबाहेर हातगाडीवर जेवण करीत असतांना सत्यासिंग बावरी हा त्या ठिकाणी आला आणि विनाकारण डोक्यावर टपली मारत दारुसाठी पैसे मागीतले. यावरुन किरकोळ वाद होऊन राहुल घरात शिरला. त्याच्या मागेच सत्यासिंग बावरी, त्याचा भाऊ करतारसिंग व मालाबाई, कालीबाई बावरी आदी चौघे राहुलच्या घरी आले. राहुल याला घरातून बोलावून वाद घालत त्यांनी राहुल चा भाऊ अजय व आई म्हाळसाबाई यांना मारहाण करण्यास सुरवात केली. हाणामारीत सत्याने लपावून आणलेला चॉपर राहुलच्या पोटात खुपसला. जखमी राहुल याला तात्काळ जिल्हा रुग्णायलयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. रात्रीतून कालीबाई बावरी हिला अटक केली, कालीबाईला आज न्यायालयात हजर करण्यात असता दोन दिवस पोलिस कोठडीत सुनावली आहे.