जळगाव शहर हद्दीतील दुचाकी चोरीचा उलगडा
जळगाव : जळगाव शहर हद्दीतून चोरीस गेलेल्या दुचाकीप्रकरणी बोदवड तालुक्यातील राजूरच्या चोरट्यास अटक करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. प्रदीप बाबूराव लुटे (30) या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याने जळगाव शहरातून राजेश हॅण्डलूमशेजारून 19 जानेवारी रोजी दुचाकी चोरल्याची कबुली देत वाहन पोलिसांना काढून दिले आहे. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र गायकवाड, राजेंद्र पाटील, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, गफूर तडवी आदींनी केली. आरोपीला जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.