भुसावळ । नगरपरीरषदेचे माजी सभापती तथा रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया (गवई) गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंंशी यांच्या मंगळवारी वाढदिवस असलातरी भीमा-कोरेगाव दुर्दैवी घटनेमुळे तो अत्यंत साध्या पद्धत्तीने साजरा करण्यात आला. यानिमित्त सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीवरून शुभेच्छा देऊन वर्षाव केला.
अन्य कार्यक्रमांना फाटा
सूर्यवंशी यांचा वाढदिवस त्यांचे हजारो चाहते व मित्र परीवारातर्फे मोठ्या प्रमाणात विविध प्रभागात केक कापून, फळ वाटप करून तसेच ठिकठिकाणी बनर लावून जंगी सत्कार करतात मात्र भीमा-कोरेगाव घटनेमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. असे असलेतरी पालिकेचे नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपा शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, पिंटू ठाकूर, अॅड.बोधराज चौधरी आदींनी नगररीषद कार्यालयात तसेच मित्र परिवार व चाहत्यांतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सूर्यवंशी यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा केला.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी नगरसेवक रवी सपकाळे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, शेख बाबुलाल, शेख हबीब, राजा लाहोरीया, राजू साळुंके, विरु चंडाले, ईश्वर इंगळे, अशोक बोरेकर, महेंद्र कोचुरे, नागसेन सुरळकर, संतोष वानखेडे, जगदीश कोचुरे, संजय तायडे, राजासिंग छाबडा, शेख युसूफ, किशोर वानखेडे, शेख फईम, कृष्णा दामोदर, इमरान शाह, मनोहर सुरळकर यांच्यासह शहरातील नागरीक उपस्थित होते.