कल्याण : काल मध्यरात्रीच्या सुमारास पाटलीपुत्र एस्प्रेसमध्ये कल्याण कसारा दरम्यान तीन दरोडेखोरानी एकच थैमान घातले .जनरल बोगी मध्ये घुसलेल्या या त्रिकूटाने प्रवाशाना मारहाण करत त्यांच्याजवलील पैसे हिसकावत एकच दहशत माजवली त्यामुळे संतापलेल्या प्रवाशानी आरडा ओरड करत त्यामधील एका प्रवाशाला पकडले मात्र कसारा रेल्वे स्थानकापूर्वी एक्सप्रेस चा वेग मंदावल्याचा फायदा घेत उर्वरित दोघा दरोडेखोराणी पळ काढला .कसारा रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी या दरोडेखोरला आरपीएफ जवांनांच्या ताब्यात दिले .श्रावण तेलम 20 असे या दरोडेखोराचे नाव आहे . या प्रकरणी इगतपुरि लोहमार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार झालेल्या दोन दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे .या दरोडेखोरांनी याआधी एकदा अशाच प्रकारे ट्रेन मध्ये लुटपाट केल्याचे तपासात उघडकीस आले आहे .
लोकमान्य टिळक टर्मिनस हुन काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मिनीटांनी सुटलेली पाटली पुत्र एक्स्प्रेस 1 वाजण्याच्या सुमारास कल्याण रेलवे स्थानकावर पोहचली .सव्वा एक वाजण्याच्या सुमारास एक्सप्रेस कसारयाच्या दिशेने मार्गस्थ झाली असताना कल्यान ते कसारा दरम्यान तीन अज्ञात तरुणांनी प्रवाशाना मारहाण करत त्यांच्या खिशातील पैसे हिसकावण्यास सुरुवात केली .यावेळी उदय यादव या प्रवाशाला माऱहान करत त्यांच्याजवळ चे साडे सात हजार रुपये हिसकवले .त्याची लूट सुरू असताना इतर प्रवाशांनी धाडस दाखवत आरडाओरड सुरू करत त्यांना पकडन्याचा प्रयत्न केला याच दरम्यान कसारा रेलवे स्थानका आधी मेल चा वेग मंदावल्याची संधी साधत या तिघांपैकी दोन जण निसटण्यात यशस्वी झाले तर एक दरोडेखोर तरुण प्रवाशांच्या हाती लागला.प्रवाशांनी कसारा रेल्वे स्थानकावर गाडी थांबताच या दरोडेखोर तरुणाला आरपीएफ च्या ताब्यात दिले .श्रावण तेलम असे या दरोडेखोर तरुणाचे नाव आहे .इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यात उदय यादव या प्रवाशने दिलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी श्रावण तेलम सह त्याच्या पसार झालेल्या दोन साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करत पसार झालेल्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे तर हा गुन्हा कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार आहे.