राजेंद्र वराडे यांना मारहाण करणार्‍यांना अटक करा

0

जळगाव । नुतन मराठा महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचरपदावर असलेले राजेंद्र जयराम वराडे यांना आठ ते दहा जणांनी महाविद्यालयाच्या बाहेर मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे हल्लेखोरांना त्वरीत अटक करण्यात यावी अशी मागणी वराडे यांच्या पत्नी यांनी निवेनदनातून केली आहे. राजेंद्र वराडे हे आजारी असल्यामुळे 29 जून ते 17 जुलैपर्यंत रूग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर 17 जुलैला अनिल इंगळे, रजिस्ट्रार व राजाबापू भोईटे, ओ.एस. यांनी वराडे यांना हजेरीपत्रकावर सह्या करू दिल्या नाहीत. त्यानंतर अ‍ॅड. विजय भास्कर पाटील भेटण्याचे सांगितले. मात्र, कामात असल्याने लक्षात न राहिल्यामुळे पाटील यांची भेट होवू शकली नाही. याचाच राग येवून अ‍ॅड. विजय पाटील व अनिल इंगळे तसेच राजबापू भोईटे यांनी संगनमताने पियुष नरेंद्र पाटील व त्यांचे सराईत गुंडांनी वराडे यांना मारहाण केली. या मारहाणीत वराडे गंभीर जखमी झाले आहेत, असा आरोप वराडे यांच्या पत्नींनी केला आहे.