रावेर- कार्तिक एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशीला संत नामदेवांची जयंती व भारताच्या पूर्व पंतप्रधान स्व. इंदिराजी यांची 101वी जयंती राजे रघुनाथराव देशमुख मुक्तद्वार वाचनालय या ठिकाणी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सदस्य कैलास पारधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते दिलीप कांबळे, पी.एम.महाजन, प्रा.दीपक पाटील होते. कामगार नेते दिलीप कांबळे यांनी याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. वाचनालयाचे उपाध्यक्ष अशोक सोनार व सचिव अशोक शिंदे यांचेही समयोचित भाषण या ठिकाणी झाले. कार्यक्रमास यश महाजन, शेख मतीन शेख साजीद, रवी पाटील, योगेश महाजन, चंद्रकांत शिंपी यांच्यासह अनेक वाचक उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे ग्रंथपाल रवींद्र सराफ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपाल मिस्त्री यांनी सहकाय केले.