यावल। तालुक्यातील राजोरे आणि परसाळेचा ग्रामसेवक हिरामण रामसिंग पाटीलला लाचलुचपत खात्याच्या पथकाने 700 रुपयांची लाच घेताना शहरातील बसस्थानकावर रंगेहाथ पकडले.
पाडळसे येथील तक्रारदाराच्या नावावरील भूखंड व घरातील हिस्सा भावाच्या नावावर करण्यासाठी एक हजाराची रक्कम स्वीकारताना याला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. पाटीलला नंतर वन विभागाच्या विश्रामगृहात नेण्यात आले. पुढील जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते.