राज्यभरात पंधरा ते वीस चोरल्या कार

0

जळगाव। एमआयडीसी पोलिसांनी पुणे पुणे-मुंबईतून भाड्याने कार करुन जळगाव-जामनेर रस्त्यावर घेवुन जात चालकाला उतरवुन वाहन पळवणार्‍या भामट्याला अटक असून चोरट्याने संपुर्ण राज्यातून पंधरा ते विस महागड्या कार चोरुन नेत बनावट कागदपत्रांच्या अधारे त्यांची विक्री केल्याचे निष्पन्न झाले असुन राज्यभरातील पोलिसदलास आव्हान देणार्‍या या चोरट्याला ताब्यात घेतल्यावर त्याने जिल्ह्यातील पाच कार लाबवल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. यातच त्याच्याकडून आणखी काही लहान-मोठ्या चोर्‍या उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मुंबई-पुणे येथुन जळगाव, जामनेर पर्यंत साठी भाडेतत्वावर इन्व्होवा, अर्टीका सारख्या महागड्या कार बुक करुन प्रवास करायचा. ऐन पहाटेच्या वेळेस अंधार्‍या निर्जन रस्त्यावर लघवीचे नाट करुन खाली उतराचे, किंवा मोबाईल खाली पडल्याचे सांगत चालकाला उतरवुन कार घेवुन पोबारा करायचा अशा पद्धतीने जळगाव जिल्ह्यात येवुन पाच महागड्या कार चोरुन नेल्याच्या घटना महिन्याला एक या प्रमाणे गेल्या पाच महिन्यात घडल्या आहेत. पिंप्री चिंचवड (ता.पुणे) पोलिसांनी कारचोरीच्या गुन्ह्यात सय्यद शकील सय्यद युसूफ(वय-37) याला अटक केली होती, संशयीताच्या पुर्वीपासुनच मागावर असलेल्या औद्योगीक वसाहत पोलिस पथकाने पुणे येथुन आपल्या गुन्ह्यात वर्ग करुन संशयीताला जळगावी आणले आहे. अटकेतील संशयीत सय्यद शकील याने जळगावातून पाच कार लांबवल्याची माहिती औद्योगीक वसाहत पोलिसांना दिली आहे. संशयीताकडून या पाच कार व्यतीरीक्त इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता निरीक्षक सुनील कुराडे यांनी व्यक्त केली आहे.

या कार चोरल्याची कबुली
औद्योगीक वसाहत पोलिसठाण्यात दाखल गुन्ह्यात देवांग सतिषभाई रावल(मुंबई) यांच्या मालकीची इन्व्होवा कार क्र (जी.जे.09बीडी.1817) 29 डीसेंबर 2016 रोजी मुंबईहुन जामनेर लग्नाला जाण्यासाठी भाड्याने घेवुन चालकला उतरवुन पळवून नेली होती. विक्रम धिरेंद्र दास (वय-40) भाईंदर मुंबई, यांच्या मालकीची अर्टीका कार क्र (एमएच.02सीआर 1887) अशीच भाड्याने करुन आणुन ती 3 मार्च 2017 रोजी चालकाला उतरवुन पळवून नेली. निसार शेख शब्बीर (वय-27) यांच्या मालकीची नवी इन्व्होवा कार क्र (एमएच.क्र. एमएच.12 एफके.5275) 4 एप्रील 2017 रोजी जळगाव जामनेर रस्त्यावर चालकाला उतरवुन पळवून नेली होती. या व्यतिरीक्त संशयीतावर पाचोरा, जामनेर आदी पोलिस ठाण्यात कार चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

आरटीओ ऐजंटगिरीचा विक्रीत उपयोग
अटकेतील संशयीत सय्यद शकील सय्यद युसूफ (वय-37) हा बुलढाणा येथील आरटीओ कार्यालयात पुर्वी ऐजंट म्हणुन काम करीत होता. वाहनांची कागदपत्रे, लायसन्स तयार करणे व इतर कामांची परीपुर्ण माहिती असल्याने शकीलने डोक वापरुन चोरी केलेल्या कारची खोटी कागदपत्रे तयार करुन नव्या नंबरसह त्यांची विक्री केल्याची माहिती समोर
आली आहे.

चोरटा सापडला पुण्यात
पाच महिन्यातच तिन कार चोरीला गेल्याने आणि तिघ गुन्ह्यात भाड्याने कार घेवुन चोरट्याने वाहन लांबवल्याचा प्रकार असल्याने निरीक्षक कुराडे यांनी संशयीताच्या शोधार्थ उपनिरीक्षक नाना सुर्यवंशी, रतिलाल पवार, विजय दामोदर पाटील, भास्कर ठाकरे, जितेंद्र राठोड यांचे पथक लावले होते. संशयीत सय्यद शकील सय्यद रऊफ याच्या मागावर असलेल्या औद्योगीक वसाहत पोलिसांनी बुलठाणा जिल्ह्यात तब्बल महिनाभर सापळा लावुनही संशयीत साडून आला नाही ऐनवेळेस पुणे पोलिसांनी त्याला अटकेल्यावर त्याला गुन्ह्यात वर्ग करुन अटक केली.