राज्यमंत्री बच्चू कडू यांचे भुसावळात जल्लोषात स्वागत : प्रांताधिकारी कार्यालयात बैठकीला सुरुवात

भुसावळात प्रहार पक्षातर्फे भरगच्च कार्यक्रम : स्वागतासाठी आज दुपारी दुचाकी रॅलीही निघणार

भुसावळ : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शुक्रवार, 27 रोजी सकाळी जळगाव शहरात आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी जळगावातील निलेश बोरा यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व नंतर सकाळी 11 वाजता वाहनाने भुसावळ गाठल्यानंतर त्यांचे प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी व पदाधिकार्‍यांनी स्वागत केले. प्रसंगी 11.30 वाजता मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक सुरू झाली आहे.

यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत. मंत्री महोदयांकडून शहरातील अतिक्रमणासह विविध विषयांचा आढावा घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दुपारी निघणार रॅली
बैठकीनंतर मंत्री बच्चू कडू हे अनिल चौधरी यांच्या न्यू एरीया वॉर्डातील निवासस्थानी सदिच्छा भेट देतील व दुपारी एक वाजता प्रहार अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष फिरोज शेख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, दुपारी 1.30 वाजता प्रहार जिल्हा उपाध्यक्ष संजय आवटे यांच्या निवासस्थानी भेट, दुपारी 1.50 वाजता विनोद कदम यांच्या निवासस्थानी भेट, दुपारी दोन वाजता दीपनगर वीज निर्मिती केंद्रात कामगारांच्या समस्यासंदर्भात बैठक, दुपारी 3.10 वाजता साईबाबा मंदिर दर्शन व दुपारी 3.30 वाजता साईबाबा मंदिर ते अलॉयसीस स्कूलपर्यंत बाईक रॅली व रोड शो, सायंकाळी पाच वाजता अकलुदला कार्यकर्ता मेळावा व अपंगांना साहित्य वाटप करण्यात येईल. दौर्‍यांप्रसंगी प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत आहेत.