राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा परिक्षेत १५ विद्यार्थ्यांचे यश

0

चाळीसगाव येथे डॉ. सुनिल राजपूत यांनी केले मार्गदर्शन
चाळीसगाव – अबॅकसमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता, आकलनशक्ती, सृजनशीलता अभ्यासातील वेग अचूकता वाढत असून राज्यस्तरीय स्पर्धेत वेदीकाज इंटरनॅशनल एकादमीच्या विद्यार्थ्यांनी संपादन केलेले यश गौरवशाली परंपरा जोपासणारे राहिले आहे, असे डॉ.सुनिल राजपूत यांनी सांगितले. वाणी मंगल कार्यालयात नुकतेच राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. राजपूत बोलत होते. मागील काही वर्षांपासून जगामध्ये शैक्षणिक क्षेत्रात विविध नावीन्यपूर्ण बदल, नवनवीन संकल्पना समोर आलेल्या आहेत. त्याचे चांगले परिणाम आज सर्वत्र पहावयास मिळत असून यात शहरातील वेदीकाज इंटरनॅशनल एकादमीच्या माध्यमातून वैदिक गणित या संकल्पनेतून बहुतांशी विद्यार्थी जोडले गेले आहेत.

यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव
यात कौस्तुभ बच्छाव, कमलेश निकम, अर्णव बच्छाव, गोवर्धन पवार, लोकेश पाटील, चैतन्य पाटील, दर्श मराठे, प्रथमेश देशमुख, प्रणित ब्राह्मणकर, ऋषीदीप निकम, शंतनू पाटील, साक्षी पाटील, जयंत पाटील, मानस पाटील, प्रणव कुडे आदी विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात आले. यावेळी अश्विनी पवार, नेहा पाटील, प्रितम बैरागी, राधा देशमुख, विवेक मराठे, अजय ब्राह्मणकर, जयवंत पाटील यासह मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
भविष्यात पाल्यासाठी फायदेशीर ठरणारे निर्णय आपल्याला योग्यवेळी घेणे गरजेचे असते यात चांगले शिक्षण म्हणजे फक्त परिक्षा पास होणे वा चांगले गुण मिळवीणे इतका नसून अबॅकस सारख्या शैक्षणिक प्रगतीतून विद्यार्थ्याला सर्वगुण करुन आधूनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांची साधलेली प्रगती कौतूकास्पद राहिली आहे, असे स्मिता बच्छाव यांनी सांगितले. तसेच शहरासोबत ग्रामीण भागात मुबलक शुल्क आकारुन हा अभ्यासक्रम ग्रामीण भागात पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे छाया पाटील यांनी यावेळी सांगितले. यात शहरातील वेदीकाज इंटरनॅशनल एकादमीच्या ६ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले होते. या औचित्यपर शनिवारी वेदीकाज इंटरनॅशनल एकादमीतर्फे गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सी.आर.कळंत्री विद्यालयाचे चेअरमन डॉ.सुनिल राजपूत, युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव, जगतराव अहिरराव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.