धरणगाव । येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थीनी रूपाली रमेश महाजन हीने आळंदी, पुणे येथे पहिली ज्युनीयर मुलींची कुस्ती स्पर्धा 14 ते 15 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. राज्य अजिंक्य पद महिला कुस्ती स्पर्धेत 48 किलो. वजन गटात रूपाली महाजन हिने कोल्हापुरच्या राष्ट्रीय विजेत्या पुजा बरकाडे इच्यावर मात करून सुवर्ण पदक पटकविले. दंगल चित्रपटात कुस्तीपटू गीता फोगाटच्या भूमिकेमुळे कुस्तीसारख्या पुरूषांची वक्तेदारी असलेल्या क्षेत्रात ग्रामीण भागातील मुलीही प्राविण्य मिळवू शकतात हे सिध्द करून दाखविले.
जिद्द व चिकाटीमुळे संधीचे केले सोने
मुळत: अत्यंत बुध्दीमान असणार्या ह्या तरूणीने स्वत:च्या मेहनतीने जिद्द व चिकाटीणे संधीचे सोने तिने केले. वडीलांची इच्छा आपली मुलगी शिकावी त्यांनी मोठे व्हावे. यशाचे मोठे शिखर गाठावे यासाठी मेहनत व मोलमजूरी करून मुलींना शिक्षणासाठी कुस्तीपटूसाठी प्रोत्साहित केले. तीच्या या यशात आई वडीलांची मोलाची भूमिका आहे. खान्देशकी छोरीया छोरोसे कम है? असे उद्गार तिचे वडील रमेश महाजन यांनी अभिमानाने काढले. रूपाली महाजन पुढील शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय कुस्तीस्पर्धेसाठी व्यायाम शाळा आळंदी येथे सराव करण्यासाठी गेलेली आहे.
शिक्षक वृंदाकडून अभिनंदनाचा वर्षाव
यशाबद्दल पी.आर. हायस्कूल सोसा.चे अध्यक्ष डॉ. अरूण कुलकर्णी, संस्थेचे उपाध्यक्ष व्ही.टी.गालापुरे सर, सचिव डॉ. मिलींद डहाळे, संचालक अजय पगारिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टि.एस. बिराजदार, उपप्राचार्य एच.एम. मेहतर, उपप्राचार्य वा.ना.आंधळे, पर्यवेक्षक आर.आर. पाटील, कला विभाग प्रमुख प्रा. बी.एल.खोंडे, ग्रंथपाल प्रा. पंकज देशमुख, क्रिडा शिक्षक प्रा. डि.एन. पाटील, अविनाश पारेख, दिलीप चव्हाण व सर्व सन्मानीय संचालक मंडळ प्रा. बंधू-भगिणी व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी तिचे अभिनंदन केले. तिच्या या यशाबद्दल धरणगाव महाविद्यालयात भटाक्यांची आतीशबाजी करण्यात आली व विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला.