राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनचे यश

0

जळगाव । मुंबई येथे 18 ते 23 जानेवारी व 26 ते 28 जानेवारी या दरम्यान 27 वी राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा व चौथी मृणालाइ गोरे स्टेट रॅकिंग कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही स्पर्धेत जैन इरिगेशनचा कॅरम संघाने सहभाग नोंदवून सर्वात जास्त मानांकन प्राप्त केले. त्यांच्या आज कांताई सभागृहात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, माजी कुलगुरू के.बी.पाटील, महाविर बँकेचे अध्यक्ष दलीचंद ओसवाल, जैन स्पोर्टस् अ‍ॅकेडेमीचे क्रीडा प्रशिक्षक फारूक शेख व व्यवस्थापक अरविंद देशपांडे यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.

27 वी अजिंक्यपद कॅरम स्पर्धा
दादर येथे 18 ते 23 जानेवारी रोजी पार पडलेल्या स्पर्धेत सांघीक गटात जैन इरिगेशनच्या संघाला तिसरे स्थान प्राप्त झाले. बलाढ्य अशा ओ.एन.जी.सी. च्या संघाला पराभूत केले. तसेच जैनचा योगेश घोडगेने अभिषेक भारतीचा 2-1 ने पराभव करून अजिंक्यपदी पटाकाविले. स्पर्धेच्या अंतिम निकालात पुरूष एकेरीमध्ये योगेश घोगडे प्रथम तर जैनचा मोहम्मद साजीद तीसरा व पंकज पवार चौथा क्रमांकावर राहिला. महिलांमध्ये मात्र जैनची आयशा मोहम्मदने तीसरा तर निलम घोडगे हिने चौथा क्रमांक पटकाविला.

चौथी मृणालीताई स्टेट रॅकींग स्पर्धा
गोरेगाव मुंबई येथे 26 ते 28 जानेवारी दरम्यानच्या स्पर्धेत जैनची अयशा मोहम्मद हिने प्रथम क्रमांक तर निलम घोडके हिने तिसरा क्रमांक व मिताली हिने पाचवा क्रमांक पटकाविला पुरूषांमध्ये जैनचा नईम अन्सारी पाचा तर पंकज पवार साहवा स्थानी राहिला.