राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत बॉक्सिंग पंचचा दबदबा

0

शिरपूर । धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेला शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत मनीष जाटने पहिले सुवर्णपदक मिळून दिले. रौप्यपदक राज पाटील यांनी मिळविले तर कास्यपदक सचिन पावरा, नयन सोनवणे, ओम राजपूत, पिंटू पावरा यांनी आपआपल्या वजनी गटात पदक मिळविले. या मिळालेल्या यशाबद्दल धुळे जिल्हा बॉक्सिंग संघाटनचे अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्ष एकनाथ बोरसे, खजिनदार राजेंद्र बोरसे, क्रीडा संचालक प्राध्यापक एल. के. प्रताळे, प्रा. राधेश्याम पाटिल, मार्गदर्शक प्रशिक्षक या राज्य शालेय बॉक्सिंग स्पर्धेत प्रशिक्षक विजेंद्र जाधव, अमोल शिरसाठ, भरत कोळी, धिरज पाटिल, नूर तेली, योगेश पाटिल, दिपक ठाकुर, नवनीत पाटिल, सचिन पाटिल, सुनील पावरा, शैलेश पाटिल, धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना सचिव मयूर बोरसे यांनी अथक परीश्रम घेतले. क्रीडा क्षेत्राचा विकास ग्रुप यांनी सुवर्ण सोनिरी शुभेच्छा दिल्या.