राज्यस्तरीय बौध्द धम्मीय वधू-वर परिचय मेळावा

0

धुळे । येथील बोधीसत्त्व प्रतिष्ठानतर्फे बौध्द वधू-वर परिचय सूचक केंद्रामार्फत शहरातील कल्याण भवनात नुकताच 11 वा राज्यस्तरीय बौध्द धम्मीय वधू-वर परिचय मेळावा झाला. मेळाव्यात 83 मुले व 135 मुलींनी परिचय करून दिला. दोन सत्रात हा मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन डॉ. विक्रम वैध व डॉ. प्रज्ञा विक्रम वैध यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून अँड़ महेंद्र निळे, नालंदा निळे, प्रणाली मराठे, वाल्मीक दामोदर, नगरसेविका सुशीला ईशी, डॉ. अरूण साळुंखे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एम.जी.ढिवरे होते. सुरुवातीला मोहन मोरे यांनी मेळाव्याची भूमिका विशद केली. प्रास्ताविक डॉ. सुरेंद्र मोरे यांनी केले.

जातीयता नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाहांची गरज
उद्घाटनपर मनोगतात डॉ. विक्रम वैध यांनी मेळाव्याच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. यावेळी अ‍ॅड.महेंद्र निळे म्हणाले की, अशा मेळाव्यांचा लाभ समाजबांधवांनी घेऊन मेळावा यशस्वी करावेत. राहुल वाघ म्हणाले की, सामूहिक कृती आंबेडकरी चळवळीतून लुप्त होताना दिसून येत आहे. ’कास्ट इन इंडिया’ या ग्रंथात डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जातीयता नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाहाचे व सामुदायिक विवाहाचे आयोजन करणे काळाची गरज आहे. विवाहाच्या अगोदर हळद लावण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. बौध्द धम्मात हे नाकारले आहे, असेही ते म्हणाले. दोन्ही सत्राचे सूत्रसंचालन प्रा. सुरेश मोरे यांनी केले. पहिल्या सत्राचे आभार प्रा.डॉ.विलास जाधव तर दुसर्या सत्राचे आभार प्रा.पी.बी. निकुंभ यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.बी.डी.गरूड, प्रा.डॉ. सोनावले, अँड़ उमाकांत घोडराज, भैय्यासाहेब पवार, अँड़विशाल साळवे, दीपक जाधव, व्ही.टी.गवळे, राजेश गायकवाड, इंजि. अमोल अहिरे, रवींद्र मोरे, भास्कर मोरे, एस.एम.मोरे, अंकुश महाले, कृषी अधिकारी दिनेश मोरे, देवानंद अहिरे, नरेंद्र खैरनार, निलेश बोरसे, गोपीचंद शिरसाठ, आपा कुवर, बामसेफ व मूलनिवासी संघटन, मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. दुसर्या सत्राचे काम नालंदा निळे, अरूणा मोरे, सुषमा मोरे, संगीता जाधव, सुनिता गरूड, नीशा जाधव, कीर्ती बोराळे यांनी बघितले.