राज्यस्तरीय वेटलिंफ्टिग स्पर्धेत रावेरला सलग तिसर्‍यांदा विजेतेपद

0

रावेर- सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय वेटलिंफ्टिग स्पर्धेत रावेर तालुका सरस ठरला आहे. जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत पाच सुवर्णपदक पदक तर दोन रौप्य तसेच दोन कांस्य असे एकूण 9 पदक पटकाविले. यात 14 वर्षांच्या आतील मुलांचे सर्वसाधारण विजेतेपद (जनरल चॅम्पीयनशिप) पटकाविली व राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सलग तिसर्‍यांदा विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला.

या खेळाडूंनी मिळवले यश
या स्पर्धेत तुषार महाजन, उज्वल महाजन, अनिकेत महाजन, प्रथमेश चौधरी, वैभव पांडव (सर्व सुवर्ण), दिक्षांत महाजन (रौप्य), दिक्षांत महाजन (रौप्य), प्रणित महाजन (कांस्य), नेत्रांजन पाटील (रौप्य), निहाल ढोले (कांस्य) पदक पटकावले. खेळाडूंना संदीप महाजन, अजय महाजन यांनी प्रशिक्षक म्हणून तर संघ व्यवस्थापक म्हणून अविनाश महाजन यांनी मार्गदर्शन केले. विजयी खेळाडूचे जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष प्रदीप मिसर, सचिव तथा राज्य संघटनेचे अध्यक्ष संजय मिसर, राजेश शिंदे, प्रकाश बेलस्कर, अमोद महाजन, यशवंत महाजन, मोहन महाजन, प्राचार्य डॉ.पी.वी.दलाल, क्रीडा शिक्षक उमेश पाटील यांनी अभिनंदन केले. खेळाडू श्री.व्हि.एस.नाईक महाविद्यालयातील जिमखान्यावर वेटलिफ्टींग सराव करतात.