राज्याचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक; स्मार्ट सिटी, मेट्रोसाठी मोठी तरतूद

0

आमदार लक्ष्मण जगताप यांची माहिती

पिंपरी-चिंचवड : भाजप सरकारने महाराष्ट्र राज्याचा चौथा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून यामध्ये बळीराजाला पूर्णतः न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी आणि मेट्रोसाठी भरीव तरदूत करण्यात आली असून निधी कमी पडल्यास आणखी निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुणे जिल्ह्यातील न्यायालयांच्या इमारतीसाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

जीवनमान सुधारण्यासाठी उपाय
जगताप म्हणाले, महाराष्ट्रातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी अनेक उपाय योजण्यात आले असून त्यांची देखील अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात येणार आहे. सर्वोच्च जीएसडीपी निर्माण करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात महाराष्ट्राचा जीएसडीपी 10 टक्क्यांनी वाढला आहे. राज्याच्या दरडोई उत्पन्नात देखील वाढ झाली आहे. कर्ज, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांना भरपूर त्रास सहन करावा लागला आहे. शेतकर्‍यांना त्रासातून मुक्त करण्यासाठी 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरु केली. याअंतर्गत दीड लखनपर्यंतची कर्जमाफी करण्यात आली असून नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 25 हजार रुपये पार्ट करण्यात आले आहेत.

न्यायालय इमारत लवकरच
जलयुक्त शिवार अभियानासाठी 1500 कोटी, विहिरी, शेततळी यासाठी 160 कोटी, सूक्ष्म सिंचनासाठी 432 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. राज्य शासकीय कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. पिंपरी न्यायालयाच्या इमारतीचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात येणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचेही काम एक मे पासून पासून सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आमदार जगताप म्हणाले.