राज्याची आरोग्य व्यवस्था कोमात-धनंजय मुंडे

0

मुंबई-औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात स्ट्रेचर न मिळाल्यामुळे गर्भवतीला लिफ्टपर्यंत चालवत नेले. लिफ्टच्या दरवाज्यात महिलेची प्रसूती झाली. बाळ जमिनीवर पडले त्यात नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे. औरंगाबादची घटना दुर्दैवी आणि गंभीर आहे. आज राज्याची आरोग्य व्यवस्था कोमात आहे. रुग्णालयात औषधे नाहीत, सुविधा नाहीत, सामुग्री नाही. आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णाचे बळी जात आहेत असे आरोप त्यांनी केले आहे.