राज्यातील अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर

0

मुंबई । राज्यातील 2 लाख 7 हजार अंगणवाडी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले. राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने याबाबतची अधिकृत घोषणा केली. महिला आणि बालविकास विभागाने जाहीर केलेला अंगणवाडी कर्मचार्‍यांसाठीचा मानधनवाढीचा प्रस्ताव वर्षभर रखडल्याने हा संप पुकारण्यात आला.

जोपर्यंत सरकार ठोस कृती करत नाही तोपर्यंत हा संप सुरू राहील अशी भूमिका अंगणवाडी कर्मचार्‍यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यभरातील दोन लाखांहून अधिक अंगणवाड्या सोमवारपासून बंद झाल्या. या संपाचा परिणाम राज्यातल्या सगळ्याच जिल्ह्यात दिसून आला. शिक्षणावर आधारित मानधन वाढ मिळावी, सेवाज्येष्ठतेनुसार मानधन मिळावे आणि इतर राज्यात ज्याप्रमाणे सेविकांना सुविधा मिळतात. त्याप्रमाणे राज्य सरकारने सुविधा द्याव्यात या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी हे आंदोलन सुरू केले आहे.