राज्यातील जनतेला तीन महिन्यांचे वीज बिल माफ करा

0

भुसावळ : लॉक डाऊन कालावधीतील महाराष्ट्रातील गरीब जनतेचे तीन महिन्यांचे घरघुती वीज बिल संपूर्णपणे माफ करावी, अशी मागणी जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी उर्जा मंत्री यांच्याकडे केली आहे.

वीज ग्राहकांना द्यावा दिलासा
कोरोनासारख्या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी आणि हे संकट हद्दपार करण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन आहे. या परीस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देणारे जनतेच्या हिताचे अनेक महत्वपुर्ण निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतले आहेत. आपल्याकडे असलेल्या ऊर्जा खात्यांतर्गत लॉक डाऊन कालावधीत बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांच्या वीज बिलातील स्थिर आकार पुढील तीन महिन्यासाठी स्थगित करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे शिवाय महाराष्ट्रातील गरीब जनतेला 100 युनिट पर्यंत मोफत विजय देण्याची योजना आपण आखली होती परंतु काही तांत्रिक व प्रशासकीय कारणामुळे ती तात्काळ लागू होऊ शकली नाही. भविष्यात आपण या योजनेची अंमलबजावणी राज्यात कराल या बद्दल तिळमात्र शंका नाही. महाविकास आघाडी सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असले तरी आज हातावर पोट असलेल्या गोर गरीब सामान्य माणसांच्या समोर प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत. दररोजच्या जीवनातील जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याची ताकद सुद्धा सर्वसामान्य माणसाजवळ राहली नसून अशा परीस्थितीमध्ये लोकडाऊन च्या कालावधीतील घरघुती विज बिल भरणे त्यांना अशक्य आहे लॉक डाऊन कालावधीत 3 महिन्याचे संपुर्ण घरघुती वीज बिल माफ करून राज्यातील गरीब जनतेस दिलासा द्यावा, अशी अपेक्षा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी केली आहे.