राज्यातील शेतकर्‍यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न

0

अमळनेर । सध्या महाराष्ट्र भर शेतकर्‍यांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला आहे. शेतकरी संपाच्या नावाखाली रस्त्यावर हजारो लिटर दूध फेकले जात आहे. कांदे, टमाटे फेकले जात आहे. दरम्यान शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी बैठकीत चर्चा करण्यात आली असून शेतकरी संप मागे घेण्यात आले असून शेतकर्‍यांना भिकार नाही तर स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

अमळनेर येथे कृषी उत्पन्न बाजार समितत आयोजित कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. उसा प्रमाणे दुधाला देखील एफ.आर.पी. लागू करुन शेतकर्‍यांना खत, बियाणे, पाणी, हमी भाव देण्याबाबत शासन सकारात्मक असून जलयुक्त शिवार योजने अंतर्गत 20 हजार कोटी खर्च अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. दूध, भाजीपाला फेकणारा शेतकरी नाही तर विरोधकच आहेत. शरद पवार यांनी शेतकर्‍यांचा प्रश्न समजवण्याची गरज नसल्याचा टोलाही त्यांनी याप्रसंगी लगावला. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पुजन करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर खासदार ए.टी. पाटील, आमदार शिरीष चौधरी, स्मिता वाघ, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, अनिल पाटील, बाळासाहेब पाटील, सोनुबाई राजू पवार, मिना पाटील, प्रफुल्ल पवार, सुरेश पाटील, उदय पाटील, विश्वास पाटील, भगवान कोळी, श्याम अहिरे, महेश देशमुख, पावबा पाटील,भटा साहेबराव पाटील, अ‍ॅड.श्रावण सदा ब्रह्मे, कामराज पाटील, महेश पाटील, अ‍ॅड.व्ही. आर.पाटील, संदीप पाटील, गिरिष पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन हिरालाल पाटील तर आभार माजी संदीप पाटील यांनी मानले.