राज्यातील 12 पोलिस निरीक्षकांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदल्या

0

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कुराडेंसह बोदवडच्या सतीश भामरेंचा समावेश

भुसावळ (गणेश वाघ)- राज्यातील 12 वरीष्ठ पोलिस निरीक्षकांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदल्या झाल्या असून त्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक सुनील कुराडेंसह बोदवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश भामरेे यांचा समावेश आहे. एसीबीत रूजू झाल्यानंतर या अधिकार्‍यांना एक टप्पा प्रमोशन या प्रमाणे पोलिस उपअधीक्षकपदी बढती मिळणार आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांनी बदलीबाबतचे आदेश 29 रोजी काढले.

राज्यातील 12 अधिकार्‍यांच्या बदल्या
राज्यातील 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. बदली झालेल्यांमध्ये सुनील बाबासाहेब कुराडे (जळगाव), सतीश दामोदर भामरे (जळगाव), सुजय उदयसिंग घाटगे (नाशिक ग्रामीण),  दिनकर मुरलीधर पिंगळे (लोहमार्ग, मुंबई), संजीव मनेाहर पाटील (ठाणे शहर), अजितकुमार रामचंद्र जाधव (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सांगली), राजेंद्र रंगनाथ साळुंखे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, लातूर), अनंत महिपतराव कुलकर्णी (औरंगाबाद ग्रामीण), महेश दत्तात्रय चाटे (नागपूर शहर), सीमा दीपक मेहंदळे (नागपूर शहर), गजानन रमेश विखे (नागपूर ग्रामीण), राजकुमार भानुदास डोंगरे (बृहन्मुंबई) यांचा समावेश आहे.

स्थानिक गुन्हे शाखेवर वर्णी लावण्यासाठी फिल्डींग
वरीष्ठ निरीक्षक कुराडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेची धुरा सांभाळताना अनेक गुन्ह्यांचा उलगडा केला होता शिवाय अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळखही होती. कुराडे यांना विनंती बदलीत एक वर्ष मुदतवाढ मिळाली होती. कुराडे यांच्यानंतर गुन्हे शाखेची खुर्ची कुणाला मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील अनेक वरीष्ठ निरीक्षक त्यासाठी पात्र असून आतापासूनच त्यांनी वर्णी लागण्यासाठी फिल्डींगही लावल्याचे समजते.