राज्यातील 15 पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या

0

जळगाव डीवायएसपी संजय सांगळे यांची राज्य गुप्त वार्ता विभागात बदली

भुसावळ- राज्यातील 15 पोलिस उपअधीक्षकांसह तीन अपर पोलिस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश राज्याचे गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी गुरुवारी दुपारी काढले. त्यात जळगावचे पोलिस उपअधीक्षक संजय सांगळे यांचाही समावेश आहे. सांगळे यांची राज्य गुप्त वार्ता विभागाच्या अपर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. सांगळे यांची काही महिन्यांपूर्वी मुंबई येथून जळगावात बदली झाली होती हेदेखील विशेष !

तीन अपर अधीक्षकांच्याही बदल्या
राज्यातील 15 पोलिस उपअधीक्षकांसह तीन अपर अधीक्षकांच्या बदल्याही झाल्या असून त्यात भोकर अपर पोलिस अधीक्षक गणेश गावडे यांची औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी, औरंगाबाद ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांची औरंगाबाद राज्य गुप्त वार्ता विभागाच्या उपायुक्तपदी तर औरंगाबाद राज्य गुप्त वार्ता विभागाच्या उपायुक्त अपर्णा सुधाकर गीते यांची नांदेड नागरी हक्क संरक्षण पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली.

या पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या
नागपूरचे सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र धामनेरकर यांची गुप्त वार्ता विभागाच्या अपर उपायुक्तपदी, ठाणे राज्य महामार्गाचे पोलिस उपअधीक्षक श्रीकांत मोहिते यांची पिंपरी-चिंचवड येथे सहाय्यक पोलिस आयुक्तापदी, संगमनेर उपअधीक्षक राहुल मदने यांची श्रीरामपूर उपविभागाच्या उपविभागीय पोलिस अधीकारीपदी, शिर्डी उपअधीक्षक अशोक थोरात यांची संगमनेर पोलिस उपअधीक्षकपदी, श्रीरामपूर उपविभागाचे उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची शिर्डी उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षकपदी, बुलढाणा मुख्यालयातील विजय खैरे यांची मुंबई सायबर सुरक्षा विभागात पोलिस उपअधीक्षकपदी, भोकर उपअधीक्षक अभय देशपांडे यांची जालना उपअधीक्षकपदी, अकोला उपअधीक्षक श्रीपाद काळे यांची मुंबई नागरी हक्क संरक्षण विभागात पोलिस उपअधीक्षकपदी, नागपूर राज्य महामार्ग पोलिस उपअधीक्षक राजीव मुठाणे यांची एमआयए पुणे उपधीक्षकपदी, राज्य गुप्तवार्ता विभागाचे अपर आयुक्त सुनील गावकर यांची मुंबई शहर सहाय्यक पोलिस आयुक्तपदी, जयसिंगपूर उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांची ईस्लामपूर पोलिस उपअधीक्षकपदी, ईस्लामपूर पोलिस उपअधीक्षक किशोर काळे यांची जयसिंगपूर उपअधीक्षकपदी, बृहमुन्बईचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र चव्हाण यांची नवी मुंबई सहाय्यक आयुक्तपदी, अमरावती नागरी हक्क संरक्षण विभागाचे प्रवीण पाटील यांची भोईसर उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली.