राज्यातील 16 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

0

भुसावळ- आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरातील 16 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात काही विनंती बदल्यांचाही समावेश असून याबाबतचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांनी काढले आहेत. दरम्यान, पाच निरीक्षकांना धुळे येथे बदली मिळाली आहे.

बदली झालेले अधिकारी व बदलीचे ठिकाण असे
मुंबई लोहमार्गचे महेश बळवंतराव यांची पालघर, मुंबई लोहमार्गचे मप्रकाश पासलकर यांची पुणे व मुंबई लोहमार्गचे राजेंद्र शिरतोडे यांची ठाणे शहरला बदली करण्यात आली. अमरावती शहरचे दुर्गेश मोहनलाल तिवारी व रवींद्र नरसिंग देशमुख यांची धुळे येथे बदली करण्यात आली. बीडचे दिनेश विठ्ठलराव आहेर यांच्यासह नाशिक ग्रामीणचे राजकुमार मारोती उपासे यांची धुळ्यात विनंती बदली करण्यात आली. बृहन्मुंबई हेमंत प्रभाकर पाटील यांचीही धुळ्यात बदली करण्यात आली तसेच बृहन्मुंबईच्या अन्य सहा निरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.