भुसावळचे भाऊसाहेब थोरात यांची नंदुरबारला तर यावलचे कुंदन हिरे यांची धुळ्यात बदली
भुसावळ- आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील 55 तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश राज्याचे सहसचिव मा.आ.गुट्टे यांनी 20 रोजी रात्री उशीरा काढले. त्यात भुसावळचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांची नंदुरबारला बदली झाली असून त्यांच्या जागी त्र्यंबकेश्वर महेंद्र आर.पवार येत आहेत. यावलचे कुंदन हिरे यांची धुळे संगायो तहसीलदारपदी बदली झाली असून त्यांच्या जागी मालेगावचे जितेंद्र कुंवर येत आहेत. रावेरचे विजयकुमार ढगे यांची नाशिक महसूल तहसीलदारपदी बदली झाली असून त्यांच्या जागी नाशिकच्या कुळकायदा तहसीलदार उषाराणी एस.देवगुणे येत आहेत.
या तहसीलदारांच्याही झाल्या बदल्या
नाशिकचे निवडणूक तहसीलदार गणेश राठोड यांची चिटणीस धुळे, पाचोरा तहसीलदार बंडू कापसे यांची कळवण येथे, चोपडा तहसीलदार दीपक गिरासे यांची त्र्यंबकेश्वर येथे, चांदवडचे शरद मंडलिक यांची जळगाव कुळकायदा विभागात, धुळे संगायोचे अनिल गावीत यांची चोपडा येथे, नाशिक महसूलचे शरद घोरपडे यांची अमळनेर येथे, दोंडाईचाचे उल्हास देवरे यांची नंदुरबार येथे, अक्राणी, जि.नंदुरबारचे महादेव बारेकर यांची नंदुरबार सरदार प्रकल्पाच्या उपसचिवपदी, नाशिक संगायोचे ए.बी.गवांदे यांची पारोळा येथे, नंदुरबारचे प्रवीण चव्हाणके यांची पारनेर येथे, कळवळणचे कैलास चावडे यांची पाचोरा येथे, जळगावचे करमणूक अधिकारी महेश चौधरी यांची धुळे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारीपदी, मालेगाव संगायोचे मिलिंद कुलथे यांची धरणगाव येथे, जळगाव कुळकायद्याचे पंकज लोखंडे यांची तळोदा येथे, भडगावचे सी.एम.वाघ यांची कर्जतला, अमळनेरचे प्रदीप पाटील यांची चांदवडला, जळगावचे अमोल निकम यांची संगमनेरला, धुळ्याचे सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत पाटील यांची श्रीरामपूरला, धरणगावचे सी.आर.राजपूत यांची मालेगावला, जळगाव संगायोचे सुनील सैंदाणे यांची नगर सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारीपदी, पारोळ्याचे प्रशांत पाटील नाशिक निवडणूक तहसीलदापदी, जळगावचे मनोज देशमुख यांची नगर संगायोत, नगरचे पुर्नवसन अधिकारी राजेंद्र थोटे यांची अक्राणी येथे, धुळे रूपेश सुराणा यांची नेवासा येथे, पिंपळनेरचे नरेशकुमार टी.बहिरम यांची नगर निवडणूक तहसीलदारपदी तर पारनेरचे गणेश मरकड यांची भडगाव येथे, नाशिकच्या सुचिता भामरे यांची पिंपळनेर अपर तहसीलदारपदी, कोपरगावचे किशोर कदम यांची चाळीसगाव येथे, श्रीरामपूरचे सुभाष दळवी यांची जळगाव संगायोत, चाळीसगावचे कैलास देवरे यांची जळगाव लाभक्षेत्र विकास प्राधीकरणात तर नंदुरबार तहसीलदार नितीनकुमार पाटील यांची नाशिक कुळकायदा तहसीलदारपदी बदली करण्यात आली.