राज्यात कोट्यवधीची गुंतवणूक होणारः खा.पूनम महाजन

0

आ. योगेश टिळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

हडपसर: लाट लाट करणार्‍या विरोधकांना लाटण्याने मारण्याची वेळ आली आहे. ज्यांनी 15वर्षे सत्ता भोगली पण जनतेशी संवाद साधला नाही. त्यांच्या आता मोठ्या मुलाखती होऊ लागल्या घड्याळावर इंजिन धावू लागले अशी टिका राष्ट्रवादी आणि मनसेवर भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी केली.तसेच छत्रपतींच्या महाराष्ट्राला अग्रेसर करण्यासाठी भाजपचा पुढाकार आहे. राज्यात कोट्यवधींची गुंतवणूक होईल लाखो रोजगार निर्माण होतील असे महाजन यावेळी म्हणाल्या.

हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार व भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्धघाटन खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते झाले, यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक मारुती तुपे, उमेश गायकवाड, संजय घुले, संजीव सातव, विकास रासकर, नगरसेविका रंजना टिळेकर, उज्वला जंगले, राणी भोसले, मनीषा कदम, कालिंदा पुंडे, मंगला मंत्री, लता धायरकर, हडपसर अध्यक्ष सुभाष जंगले, संदीप दळवी, रवी तुपे, भूषण तुपे, सतीश भिसे, संतोष चव्हाण, सुदर्शन चौधरी, गणेश घुले, माऊली कुडले, नितीन होले, संदीप लोणकर, चेतन टिळेकर, जिल्हा परिषद सदस्य वंदना कोद्रे, शिल्पा होले आदी यावेळी उपस्थित होते.

सत्तेत असताना विकासकामे केली नाहीत
यावेळी आ. टिळेकर म्हणाले, खा.पूनम महाजन यांनी 24 राज्यांचे दौरे करून युवकांवर होणारा अन्याय टाळण्यासाठी काम केले, पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात दौरा सुरू केला. स्व.प्रमोद महाजनाचा समर्थ वारसा पुढे नेण्याचे कार्य करीत त्या करत आहेत. मांजरी मध्ये अजित पवार अर्थमंत्री असताना रेल्वे उड्डाणपूल का केला नाही, नागरिकांची कामे केली असती तर गल्लीबोळात बुके घेऊन फिरायची वेळ आली नसती. पालिकेत सत्तेत असताना विकासकामे केली नाहीत, आता मात्र कचरा व विविध विषयांवर आंदोलने करतात.