राज्यात चर्मकार आयोग स्थापनेची केली घोषणा

0

फटाके फोडून व पेढे वाटून घोषणेचे स्वागत
जळगाव: संत रोहिदास भवनच्या भूमिपूजनाप्रसंगी १ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आपल्या वक्तव्यात चर्मकार आयोग महाराष्ट्रात स्थापन करणार, अशी घोषणा केली. या घोषणेचे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे टॉवर चौकात राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, पांडुरंग बाविस्कर यांच्या उपस्थित फटाके फोडून व पेढे वाटून स्वागत करण्यात आले.

गेल्या वर्षी चर्मकार आयोगाच्या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे आंदोलन व मोर्चे काढून मागणी करण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या घोषणेने आनंद साजरा करण्यात आला. या वेळी राज्य उपाध्यक्षा जयश्री विसावे, नगरसेविका अंजली विसावे, जिल्हा उपाध्यक्षा सुनीता लिंडायत, सरला सावकारे, कमलबाई सोनवणे, भारती बाविस्कर, कमल सोनवणे, सिंधू सुरळकर, नाना मोरे, भगवान बाविस्कर, सुनील वाघ, धनराज पवार, मधुकर वाघ, अनिल सावंत, धनराज मोरे, रतिलाल मोरे, वसंत वाघ आदी उपस्थित होते.