राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा

0

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी; चोपडा येथे महिला मेळावा
शेतकर्‍यांची परिस्थिती नाजूक, 31 ऑक्टोंबरची वाट पाहू नका – खा.सुळे
चोपडा- यंदा संपूर्ण महाराष्ट्रात कमी पाऊस झाल्याने खरिप हंगाम हातचा गेला असून शेतकर्‍यांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे, अशा स्थितीत 31 ऑक्टोबरची वाट न पाहता सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍याना न्याय द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. चोपड्यात आयोजित महिला युवती मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी खासदार सुळे यांनी उपस्थित महिला व महाविद्यालयिन विद्यार्थीनींशी संवाद साधून त्यांच्या प्रश्‍नांना दिलखुलास उत्तरे दिली. सहाय्यक प्राध्यापक प्राजक्ता बाविस्कर, योगिता पावरा, अनन्या आशिष गुजराती यांच्यास विद्यार्थिनींनी यावेळी प्रश्न विचारले तसेच होमा वसावे या आदिवासी तरुणाने देखील यावेळी प्रश्न उपस्थित केले होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी मेळाव्याचे अध्यक्ष विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी, माजी आमदार दिलीप सोनवणे, नागपूर येथील आमदार प्रकाश गजबिये, चोसाका माजी चेअरमन अड घनश्याम पाटील,जिल्हादयक्ष रवींद्र पाटील, कार्यध्यक्ष विलास पाटील, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा विजया पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, गटनेते जिवनभाऊ चौधरी, नारायण पाटील, महेंद्र बोरसे, प्रभाबेन गुजराथी, चंद्रहास गुजराथी, अनिल भाईदास पाटील,असगर अली सैय्यद,महिला तालुकाध्यक्ष भारती बोरसे, जि.प. सदस्य नीलिमा पाटील, तालुका युवकअध्यक्ष दिपक सोनवणे, चोसाका माजी चेअरमन नीता पाटील, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, मंगला पाटील, कांचन राणे, माधुरी पाटील आदी उपस्थित होते.