मुंबई: २०१२ ते २०१७ या कालावधीत थेलेसमिया रुग्णांच्या प्रमाणात राज्यात वाढ झाली असल्याची माहिती खुद्द अरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली. त्यावरील नियंत्रणासाठी लवकरच राज्यात मोनिटरिंग कमिटीची स्थापना करण्याची घोषणा त्यांनी विधानपरिषदेत दिली. सद्ध्या राज्यात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प चालू असल्याने औषध पुरवठा कमी होत असल्याची महिती आरोग्य मंत्र्यांनी या वेळी दिली.
थेलेसमिया हा अनुवांशिक रक्ताचा आजार असल्याने यामध्ये बालरुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे या निमित्ताने सभागृहाच्या निदर्शनास आणण्यात आले. आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी यंदा एकूण ६ लाख गोळ्या पुरवण्यात आल्याची माहिती दिली. दरम्यान अजून २.५७ लाख गोळ्यांच्या खरेदीचे आदेश देण्यात आले असून जिल्हा रुग्णालये,ठाणे येथे पहिल्या टप्प्यात ६४८० गोळ्या पुरवल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण यांची सांगड नाही
दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे मत सदस्य हेमंत टकले यांनी मांडले. मात्र एक विभाग सेनेकडे तर दुसरे भाजपकडे का याचे उत्तर चंद्रकांत पाटील याना माहित असावे असा चिमटा त्यांनी काढला. आरोग्य विद्यापीठात कोणते रिसर्च झालेत याची माहिती कोणालाच नाही. त्याची माहिती घेउन त्याद्वारे उपाय योजना करण्याची मागणीही त्यांनी केली.